मारुतीच्या रुपात सिध्दनाथाचे दर्शन, हरपून गेले भाविकांचे मन!

मारुतीच्या रुपात सिध्दनाथाचे दर्शन, हरपून गेले भाविकांचे मन!
Updated on

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील श्री सिध्दनाथ मंदिरात नवरत्न काळात पोषाखाव्दारे देवाला विविध रुप देऊन पूजा बांधण्यात येते. आज शनिवारचे औचित्य साधून श्री सिध्दनाथ देवाची मारुतीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज शनिवारी श्री सिध्दनाथ मारुतीच्या रुपात अवतरल्याने भाविकांना शनिवारी मारुतीचे दर्शन मिळाले.

भक्तीमय वातावरणात गावचे पुजारी महादेव गुरव, दत्तात्रय गुरव, कृष्णात गुरव व त्यांच्या कुटुंबातील सदस्य नवरत्न काळातील बारा दिवस सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची विविध रुपातील आकर्षक पूजा बांधतात. १९९५ साली सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तेव्हापासून ही पोशाखाची परंपरा अखंड सुरू आहे. याच काळात मंदिर विद्युत रोषणाईने सजवले जाते. गावातील विद्युत क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व सर्व युवक, ज्येष्ठ मिळून हे विद्युत रोषणाईचे काम करतात. नवरत्न काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Asia's Second-Largest Banyan Tree in Maharashtra Amazes Tourists and Nature Lovers
Vadache Mhasve giant banyan tree history
landslide
yerala river flood water
Marathi News Esakal
www.esakal.com