
वडूज : चारचाकी तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात जण जखमी झाले. वडूज- दहिवडी रस्त्यावर माधवनगरजवळ श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्रसाद ऊर्फ बाबू राजेंद्र सुतार (वय २३), शिवम हणमंत शिंदे (वय २२, दोघेही रा. औंध, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत.