कार्तिकेय गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा; श्री यमाई देवीची पूजा

कार्तिकेय गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा; श्री यमाई देवीची पूजा

औंध (जि. सातारा) : श्री यमाईदेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त आज (मंगळवार) चौथ्या माळे दिवशी कार्तिकी व गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा अशी पूजा बांधण्यात आली आहे. येथील ग्रामनिवासिनी ,मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

आज (मंगळवार) चौथ्या माळे दिवशी कार्तिकी व गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा अशी पूजा बांधण्यात आली आहे. याबराेबरच आज देवीच्या पाटयापूजन,देवीची ओटीपूजन,मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीचे ओटीभरण तसेच महानैवेद्य, महाआरती हे कार्यक्रम देखील होणार आहेत.  यंदाचा उत्सव 26 आक्टोबर अखेर औंध येथे फक्त विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे.

बारा ज्योतिर्लिंगसह गणपती कार्तिकी दर्शन; श्री यमाई देवीची पूजा
 
औंध संस्थानमध्ये दरवर्षी ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो मात्र यंदा महामारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संस्थानच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम वगळून फक्त धार्मिक कार्यक्रमाने नवरात्रोत्सव साधेपणाने होत आहे.

कार्तिकी व गणपतीची पृथ्वी प्रदक्षिणा 

एके दिवस शंकर पार्वतीनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले. गमंत म्हणून दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली. स्पर्धा होती की दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करुन आधी परत येतं. आधी परतणार जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल. हे ऐकल्याक्षणी कार्तिकेय
तत्काळ आपल्या वाहनावर म्हणजे मोरावर आरुढ होऊन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला. गणपती मात्र कोणत्याच घाईत दिसत नव्हता. त्यांना अगदी सावकाश आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वंदन करू लागला.

Video : सावधान! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता खचला

पार्वतीने त्याला म्हटले अरे बाळा तुझा भाऊ कितीतरी पुढे पोहचला असेल आणि तू इथेच. त्यावर गणपती स्मितहास्य करत म्हटले, तुम्ही दोघंच माझं जग आहत आणि तमच्याभोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे. हे ऐकून शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले. त्यांनी गणपतीला म्हटले तू खरंच बुद्धीमान आहेस. आता संपूर्ण जग तुला बुद्धीदाता म्हणून ओळखेल ही गाेष्ट पालक मुलांना गणपतीची महती सांगताना आवर्जुन सांगतात.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com