औंध : श्री यमाई देवीची समुद्र मंथन स्वरुपातील पूजा

शशिकांत धुमाळ
Sunday, 18 October 2020

औंध संस्थानमध्ये दरवर्षी ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो मात्र यंदा महामारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संस्थानच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम वगळून फक्त धार्मिक कार्यक्रमाने नवरात्रोत्सव साधेपणाने होत आहे.

औंध (जि. सातारा) : येथील ग्रामनिवासिनी ,मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदाचा उत्सव 26 आक्टोबर अखेर औंध येथे फक्त विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. कोरोनामुळे सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम यंदा होणार नसल्याची माहिती श्री यमाईदेवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. तसेच शासनाच्या नियमानुसार मंदिर देखील बंद राहणार आहे.

शनिवारी (ता. 17) येथील राजवाडयातील कराड देवी येथे कोरोनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून सामाजिक अंतर राखून देवीची मकरात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पुण्यहवाचन, मंत्रपुष्पांजली, महाआरती आदी कार्यक्रम झाले. आजपासून (रविवार ता.18) आणि उद्या (सोमवार ता.19) नियमित सकाळी, सायंकाळी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रम होणार आहेत.

नवरात्रोत्सव : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अशी असणार नऊ दिवस नऊ रूपांतील उत्सवकाळातील पूजा

मंगळवार ता.20.रोजी देवीच्या पाटयापूजन,देवीची ओटीपूजन,मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीचे ओटीभरण तसेच महानैवेद्य, महाआरती हे कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रम फक्त यंदा होणार आहेत. गर्दी होईल अशा स्वरूपाचे कसलेही कार्यक्रम यंदा नवरात्रीच्या काळात होणार नाहीत. 

औंध संस्थानमध्ये दरवर्षी ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो मात्र यंदा महामारीचे मोठे संकट उभे राहिले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संस्थानच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम वगळून फक्त धार्मिक कार्यक्रमाने नवरात्रोत्सव साधेपणाने होत आहे.

कुण्डलिनीस्वरूपा श्री अंबाबाई...!  करवीर महात्म्यातील निवडक स्त्रोतांमधून देवीचे होणारे दर्शन

दरम्यान आज (रविवार) औंध (ता. खटाव) येथील श्री यमाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्तनेे समुद्र मंथन स्वरुपात पूजा बांधण्यात आलेली आहे. तसेच येथील मूळपीठ निवासिनी श्री यमाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त माळेच्या दुसऱ्या दिवशी आज (रविवार) देवीची  " भगव्या" रंगासोबतची आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे.

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aundh Yamai Devi Navratri Utsav Satara News