esakal | VIDEO पाहा : जावळीत ग्रामीण परंपरेची 'साक्ष'; जात्यावरच्या ओव्यांतून कोरोना जागृती
sakal

बोलून बातमी शोधा

Awareness Of Coronavirus

जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या, सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी गायची.

VIDEO पाहा : जावळीत ग्रामीण परंपरेची 'साक्ष'; जात्यावरच्या ओव्यांतून कोरोना जागृती

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा) : पूर्वीच्या काळात जात्यावरच्या ओव्या या ग्रामीण महाराष्ट्राच्या परंपरेची व संस्कृतीची साक्ष देत होत्या. आजच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात जाती व जात्यावरील ओव्याही कालबाह्य झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती (Rural Culture) जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्‍यातील चार प्राथमिक शिक्षिकांनी (Teacher) केला आहे. जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृतीपर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व्हिडिओचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Awareness Of Coronavirus Through Song At Kelghar Satara Positive News)

या ओव्यांचे सादरीकरण योगिता मापारी (मेढा), अंजली गोडसे (बिरामणेवाडी), प्रियांका किरवे (रेंगडीवाडी) आणि शिल्पा फरांदे (मेढा) यांनी केले आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा जपण्याचा संदेश या व्हिडिओतून दिला गेला आहे. कोरोनामुळे कित्येकांचे संसार उघड्यावर पडले. नोकरी गेली आणि जवळची माणसंही दूर निघून गेली. आपल्या निष्काळजी वागण्यामुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यातूनच या शिक्षिकांना ही कल्पना सुचली. कोरोनाची जनजागृती करण्याची आणि त्यातूनच जन्माला आली कोरोना जनजागृती ओवी.

हेही वाचा: Maharashtra Unlock : सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह 'या' जिल्ह्यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश!

जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या, सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी गायची. महाराष्ट्रातील स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गात. कोरोनाविषयी प्रबोधन व्हावे, हाच मूळ उद्देश धरून कोरोना टेस्ट करूनच या शिक्षिका एकत्र आल्या. त्यासाठी त्यांना गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, तहसीलदार राजेंद्र पोळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कर्णे यांनी प्रेरणा दिल्याचे त्या सांगतात.

हेही वाचा: शाब्बास! राष्ट्रीय बालचित्रकलेत आदिती फडतरे प्रथम

कोरोना जनजागृतीसाठी जावळी तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षिकांनी केलेला हा व्हिडिओ कौतुकास्पद आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न झाला आहे.

- कल्पना तोडरमल, गटशिक्षणाधिकारी, जावळी

Awareness Of Coronavirus Through Song At Kelghar Satara Positive News

loading image
go to top