VIDEO पाहा : भारीच! गाण्याच्या माध्यमातून जागृती; कोरोनाला रोखण्यासाठी विद्यार्थांचं अनोखं पाऊल

Coronavirus
Coronavirusesakal

केळघर (सातारा) : सध्या कोरोना संसर्गाने (Coronavirus) जगाला विळखा घातला आहे. या रोगाविषयी लोकांचे अज्ञान दूर व्हावे व लोकांमध्ये जनजागृती व्हावी, सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन कोरोनावर मात करावी, हा विचार डोळ्यासमोर ठेवून प्रबोधन करण्याच्या हेतूने केडंबे प्राथमिक शाळेतील (Kedambe School) शिक्षक व विद्यार्थांनी जनजागृतीपर गीताचा व्हिडिओ (Song Video) तयार केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Awareness Of Coronavirus Through Song Of Kedambe School Student Satara Marathi News)

Summary

केडंबे शाळेतील शिक्षक व विद्यार्थांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. कोरोनाविषयी जनजागृती या व्हिडिओतून करण्यात आली आहे.

जावळी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल यांच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे या गीताचे लेखक शिक्षक शंकर जांभळे यांनी सांगितले. केडंबे शाळेतील शिक्षक व विद्यार्थांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. कोरोनाविषयी जनजागृती या व्हिडिओतून करण्यात आली आहे. हे गीत विलास कारंडे यांनी स्वरबद्ध व संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थांनी गायन, वादनासह या गीताचे सादरीकरण केले आहे. या अनोख्या जनजागृतीबद्दल शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी तोडरमल, केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, मुख्याध्यापक सुरेश मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

Coronavirus
ज्यांना कोणीच नसतो, त्यांच्या पाठीशी परमेश्वर असतो!

कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे काम केडंबे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रबोधनपर गीताच्या व्हिडिओतून करून समाजात चांगला संदेश दिला आहे. न घाबरता योग्य ती काळजी घेतल्यास कोरोनाला हरवणे फारसे अशक्‍य नाही.

-राजेंद्र पोळ, तहसीलदार, जावळी

Awareness Of Coronavirus Through Song Of Kedambe School Student Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com