
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त २४ डिसेंबर ते चार जानेवारीपर्यंत बैलबाजाराचे आयोजन केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात जातिवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला हा बैलबाजार ट्रस्टच्या वतीने यंदा मोठ्या प्रमाणावर भरविणार असल्याने राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती १०८ श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.