
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याबाबत विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असून, त्यांच्याकडून अपप्रचार सुरू आहे. पैशाच्या जोरावर यशवंत विचाराच्या सभासदांना ते विकत घ्यायला निघाले आहेत; परंतु स्वाभिमान पैशाने विकत मिळत नाही. त्यांना केवळ राजकारणासाठी कारखान्याची सत्ता हवी आहे. विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे दिला.