
मसूर : लोकशाहीमध्ये जय पराजय असतो. पराभव झाला तर खचून जायचे नाही, आपली विकासाची परंपरा आपणाला सतत वाढविणे गरजेचे आहे. आपणाला यशवंत विचार जपायचा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.