उपमुख्यमंत्री पवारांचे वीजबिल माफीचे विधान वेळकाढूपणा : साजिद मुल्ला

हेमंत पवार
Thursday, 26 November 2020

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना रोजगारही गमवावा लागला, त्यामुळे अनेकांकडे पैसेच नाहीत. त्यातच महावितरण सध्या वीजबीलासाठी मागे लागले आहे. त्यामुळे घरगुती वीज वापराचे बील माफ करावे, अशी मागणी बळीराजा संघटनेने केली.

कऱ्हाड : लॉकडाउन काळातील घरगुती वीजबिले माफ करा, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. मात्र, सरकारकडे आत्ता निधी उपलब्ध नाही, तिजोरीमध्ये खडखडाट आहे, जेव्हा निधीची उपलब्धता होईल, तेव्हा वीजबिल माफी करू, अशी वेळकाढू प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केला आहे.
 
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या येथील समाधीस अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार येथे आले होते. त्यादरम्यान वेणूताई चव्हाण स्मृतिसदनात श्री. मुल्ला यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान पाचवीलाच पुजलेले! 

त्यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात श्री. मुल्ला यांनी घरगुती वीज बील माफीचा मुख्य विषय होता. त्यासंदर्भात चर्चा करताना त्यांनी लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना रोजगारही गमवावा लागला, त्यामुळे अनेकांकडे पैसेच नाहीत. त्यातच महावितरण सध्या वीजबीलासाठी मागे लागले आहे. त्यामुळे घरगुती वीज वापराचे बील माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

दुसऱ्या महायुद्धातील जगप्रसिद्ध काच कारखाना बंद; नेहरू, टिळकांनी दिली होती कारखान्यास भेट!

"कोरोनामुळे सरकारकडे आत्ता निधी उपलब्ध नाही. तिजोरीमध्ये खडखडाट आहे. जेव्हा निधीची उपलब्धता होईल तेव्हा वीज बील माफी करू', अशी वेळकाढू प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याचा आरोप श्री. मुल्ला यांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baliraja Shetkari Sanghatana Demands Waiver For Electric Bill To Ajit Pawar Satara News