Khambatki Tunnel : ब्रिटिशकालीन 'कात्रज' सुस्‍थितीत, 22 वर्षांचा 'खंबाटकी' कमकुवत का? प्रवाशांसाठी बोगदा ठरतोय जीवघेणा!

कात्रजच्या जुन्या बोगद्यात एकही लोखंडी खांब लावला गेला नाही.
Bangalore Pune Highway Khambatki Tunnel
Bangalore Pune Highway Khambatki Tunnelesakal
Summary

सध्याच्या आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगात केवळ २२ वर्षांपूर्वी बांधलेल्या खंबाटकी बोगदा हा जीवघेणा ठरत आहे.

खंडाळा : ब्रिटिशकालीन बांधलेला कात्रजचा (पुणे) जुना बोगदा अद्यापही एवढा सुरक्षित व मजबूत असताना, केवळ २२ वर्षांपूर्वी बांधलेला खंबाटकी बोगदा एवढा कमकुवत का? असा प्रश्‍न सध्याच्‍या अपघातांमुळे उभा राहिला आहे.

बंगळूर-पुणे महामार्गावर (Bangalore-Pune Highway) एकमेव म्हणून नावलौकिक असलेला बोगदा म्हणजे कात्रजचा जुना बोगदा होय. हा ब्रिटिशकाळात बांधला गेला आहे. या बोगद्यातून जवळपास १०० ते १५० वर्षे वाहतूक सुरू असतानाही येथे मात्र बोगद्यामध्‍ये वाहनचालकांना व प्रवाशांना बांधकामापासून कोणताही धोका झाला नाही.

Bangalore Pune Highway Khambatki Tunnel
'मनसे'च्या आंदोलनाची धास्ती; मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्‍यावर कडक बंदोबस्त; तब्‍बल 50 पोलिस तैनात

मात्र, सध्याच्या आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगात केवळ २२ वर्षांपूर्वी बांधलेल्या खंबाटकी बोगदा हा जीवघेणा ठरत आहे. येथील मोठमोठे लोखंडी खांब चालत्या गाडीवर पडत आहेत. तर मागील कित्येक वर्षे पुरेशा विजेचीही सोय नव्हती, तर बोगद्यातील सांडपाण्याची दुरवस्था झाली आहे.

Bangalore Pune Highway Khambatki Tunnel
Loksabha Election : भाजप मोठा डाव टाकणार? हायकमांडकडून 'या' बड्या नेत्याला लोकसभेसाठी ऑफर; निवडणुकीत वाढणार चुरस

तीन लेनचा महामार्ग असताना दोनच लेनचा बोगदा बनविण्यात आला, असे एक ना अनेक गैरसोयी या बोगद्यात आहेत, म्हणून या बोगद्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का? झाले तर काय रिपोर्ट दिला गेला? मग यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काय उपाययोजना केली? असे अनेक प्रश्‍न वेळोवेळी होणाऱ्या अपघातांच्या निमित्ताने येथे उभे राहत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Bangalore Pune Highway Khambatki Tunnel
NCP चा बालेकिल्ला असणारा 'हा' मतदारसंघ शरद पवार शिवसेनेला सोडणार? लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही

ब्रिटिशकालीन बांधलेल्या या कात्रजच्या जुन्या बोगद्यात एकही लोखंडी खांब लावला गेला नाही. मात्र, या काळात केलेले बांधकाम यापैकी आजपर्यंत एकही दगड खाली पडलेला नाही. मात्र, नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात लावलेले भलेमोठे लोखंडी खांब खंबाटकी बोगद्यात वारंवार खाली पडत आहे. यामुळे येथील प्रवास करणे हे धोक्याचे बनले आहे.

Bangalore Pune Highway Khambatki Tunnel
Kolhapur : दोन्ही मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये; उद्धव ठाकरेंच्या सक्त सूचना

येथील खंबाटकी बोगद्यातील लोखंडी खांब कधी खाली येईल? याचा नेमच नाही. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी तासाचा वेळ लागत असतानाही सहन करणाऱ्या प्रवाशांची तरी कदर करून या बोगद्यातील २२८ खांब तत्काळ आणि कमी वेळात मोठी यंत्रणा राबवून काढावे, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com