'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'; शिंदेंच्या आरोपावर जयंत पाटील म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोटही शिंदेंनी केलाय.

'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

सातारा : जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा एक मतानं विजय झाल्यानं आमदार शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) पराभवाचा मोठा धक्का बसलाय. याच पराभवावरुन आमदार शिंदे चांगलेच नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केलाय.

तसेच त्यांनी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही निशाणा साधलाय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोटही शिंदेंनी केलाय. शिंदे यांच्या या आरोपांबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा: 'उदयनराजेंना 'बिनविरोध' करता अन् माझा पराभव, मी दुधखुळा नाही'

शशिकांत शिंदेंनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. त्यांची भेट झाल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलू शकेल. त्यांचं मत काय आहे ते जाणून घेईन, असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना राष्ट्रवादी पॅनलमध्ये सामावून घेतल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केलाय. एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन बिनविरोध होता. ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना घेऊन तुम्ही बिनविरोध करता. मग, दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करुन देखील, तुम्ही त्यांना पराभूत कसं करता?, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केलाय.

हेही वाचा: अजित पवारांकडून उमेदवारी घेतली खरी; पण राणीनं डाव हारलाच

loading image
go to top