निवडणुकीत उदयनराजे 'NCP'कडे तीन जागा मागणार

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; पण त्यांनी जिल्हा बॅंकेत पक्ष व राजकारणविरहित राहावी, अशी भूमिका घेत राष्ट्रवादीकडे (NCP) संचालकांच्या तीन जागांची मागणी करणार आहेत. येत्या शुक्रवारी (ता. २७) होणाऱ्या बॅंकेच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर बॅंकेच्या निवडणुकीबाबत सर्व नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले या जागांची मागणी करणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत स्वत:ची एक जागा फिक्स करण्यापलीकडे लक्ष न देणाऱ्या उदयनराजेंची मागणी राष्ट्रवादीकडून मान्य होणार का, याकडे लक्ष आहे.

Summary

जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, आज (बुधवारी) कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, आज (बुधवारी) कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीच्या हालचाली गतिमान होणार आहेत. सध्यातरी इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे मागणी करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रक्रियेत उदयनराजे भोसले यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. एकतर भाजपसोबत राहून त्यांच्या पॅनेलमध्ये सहभागी होणे किंवा राष्ट्रवादीच्या सर्वसमावेश पॅनेलमध्ये सहभागी होऊन आपली जागा फिक्स करणे असे होते; पण उदयनराजेंनी जिल्हा बॅंकेची निवडणूक पहिल्यापासून सावधगिरीने घेण्याची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत ते गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून निवडून आले होते. एका निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. आताची निवडणूक ही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे ते उदयनराजेंबाबत कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

Udayanraje Bhosale
'नेल पॉलिश' लावल्यास महिलांची बोटं छाटणार; तालिबान्यांचा नवा फतवा

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस खासदार उदयनराजेंनी आपल्या स्वत:चे संचालक पदासोबत आणखी दोन जागांची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून यावेळेसही लढणार हे निश्चित आहे; पण त्यासोबतच ते राखीव जागांपैकी महिला राखीवमधील एक व अन्य एक अशा एकूण तीन जागांची मागणी करणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंची ही मागणी सर्वसमावेशक पॅनेल करताना राष्ट्रवादीचे नेते मान्य करणार का, हा प्रश्न आहे. ही मागणी मान्य झाली तर ठिक अन्यथा भाजपकडून विरोधात पॅनेलची तयारी होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारी जिल्हा बॅंकेची विद्यमान संचालकांची शेवटची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यानंतर निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठीची सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये खासदार उदयनराजेंकडून याबाबतची मागणी होणार आहे. त्यानंतरच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com