Bank Of Maharashtra चा निर्णय; गृहकर्ज, वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ

सिद्धार्थ लाटकर
Monday, 25 January 2021

ग्राहकांनी सामाजिक सुरक्षेचे सर्व नियम पाळून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन सातारा विभागाच्या क्षेत्रीय व्यवस्थापिका अपर्णा जोगळेकर यांनी केले आहे.

सातारा : बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे बुधवारी (ता.27) सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत सातारा शहर शाखा, कन्याशाळेजवळ, राजपथ, भवानीपेठ, सातारा येथे रिटेल लोन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांच्या गरजेची गृह, वाहन, मालमत्ता तारण, सोने तारण कर्ज, देश-विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी कर्ज, पर्सनल लोन अशा सर्व प्रकारांची कर्ज प्रकरणे एकाच छताखाली त्वरित मंजूर करण्यासाठी हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

बॅंक ऑफ महाराष्ट्रने रिटेल कर्जाचा व्याजदर रेपो रेटशी याआधीच संलग्न केल्यामुळे बॅंकेचा व्याजदर इतर बॅंकांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज हप्त्याचा भार कमी होईल. या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत आकारली जाणार नाही. बॅंकेच्या गृहकर्जावरील कमी व्याजदराचा लाभ घेण्यासाठी इतर संस्थांमधून घेतलेल्या गृहकर्जाचे कर्ज अंतरण (होमलोन-टेक ओव्हर) करण्याची सोयदेखील या मेळाव्यादरम्यान उपलब्ध केली आहे. 

यावेळी इच्छुक कर्जदारांसाठी त्वरित कर्जमंजुरी तसेच मोफत सिबिल तपासणी व मार्गदर्शन करण्यात येईल. ग्राहकांनी सामाजिक सुरक्षेचे सर्व नियम पाळून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन सातारा विभागाच्या क्षेत्रीय व्यवस्थापिका अपर्णा जोगळेकर यांनी केले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना

दैव बलवत्तर म्हणूनच बचावलो! सातारा- सोलापूर बस चालकाने सांगितली दगडफेकीची थरारक कथा

Video : जूना काेयना पुलावरुन पुन्हा धावणार चारचाकी वाहने?

पाकिस्तानात साजरा हाेणार मराठी भाषा गौरव दिन; विविध स्पर्धांचे आयाेजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Of Maharashtra Loan Melava In Satara On Wednesday Trending News