
कऱ्हाड : मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. कऱ्हाड- मसूर मार्गावर सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. त्यात सुनील गोपाळ पोरे (वय ६०, रा. राजसारथी कॉलनी, बनवडी) हे दुचाकीस्वार ठार झाले. याप्रकरणी मोटारचालक प्रांजल अमोल शिंदे (वय २१, रा. विद्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.