
सातारारोड : खटाव तालुक्यात अवैधरीत्या वाळू उत्खनन होत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून, याप्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना खटाव तालुक्यातील अवैधरीत्या वाळू उत्खननप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.