सातारा : बावधन सोसायटी निवडणुकीत अनेक गैरप्रकार

प्रक्रियेची चौकशी करून नव्याने निवडणूक घेण्याची सभासदांची तहसीलदार रणजित भोसलेंकडे निवेदनाद्वारे मागणी
Bavdhan Society elections Malpractice satara
Bavdhan Society elections Malpractice satarasakal

वाई : बावधन विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले असून, निवडणूक प्रक्रियेची चौकशी करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी सोसायटीच्या सभासदांनी तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही बावधन विकास सोसायटीच्या सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कार्यकाळासाठी श्री भैरवनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवित होतो.

निवडणुकीत वापरलेल्या मतपत्रिकांवर अनुक्रमांक नव्हता. हे मतदान प्राथमिक शाळेच्या चार खोल्यांत सुरू होते. प्रत्येक खोलीत प्रत्येकी ४०० मतदान होते. परंतु, खोली क्रमांक एक ते चारमध्ये किती नंबरचे बॅलेट पेपर होते, याची संख्या अथवा शिल्लक मतपत्रिकांची माहिती उपलब्ध झाली नाही. मतपत्रिकेवरील अनुक्रमांक वापरण्यात आलेले नाहीत, याचा खुलासा उपस्थित अधिकाऱ्यांना करता आलेला नाही. मतपेट्यांना कापडी आवरण घालून सील न करता पत्रापेटीला वरून कुलूप लावले होते. त्या मतपेट्या कोणाच्या ताब्यात दिल्या होत्या, त्यानंतर किती वेळाने मतमोजणीस सुरवात केली, याचा उल्लेख निवडणूक अधिकाऱ्यांना देता आला नाही.

मतपेट्यांबाबत उमेदवारांनी मतमोजणीवेळी हरकत अर्ज दिला असता वरिष्ठांच्या दबावामुळे, हरकत अर्ज घेतला नाही. कोणत्याही प्रकारची पोच देण्यास अधिकारी तयार नव्हते. हे सर्व संशयास्पद दिसून येत आहे. मतमोजणी वेळेस मतपेटीतून मतपत्रिका टेबलवर ओतल्यावर सर्वसाधारण प्रवर्गाचा २५ मतपत्रिकांचा गठ्ठा व इतर प्रवर्गांचे १०० चे गठ्ठे करून, मतमोजणी टेबलवरून आतील खोलीत सदर गठ्ठे नेऊन ठेवले जात होते. त्यावेळी त्या खोलीत बावधन सोसायटीचे पाच कर्मचारी व एक ग्रामस्थ त्या खोलीत होता. या खोलीतील मतपत्रिका आतील बाजूस ठेवल्या होत्या, हे उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधींना दिसतही नव्हते. तसेच आत मोबाईल नेण्यास मज्जाव असताना कर्मचाऱ्यांसोबत एक ग्रामस्थ होता, त्या सर्वांकडे मोबाईल होते व सर्वसाधारण गटाची मतमोजणी झाली त्यावेळी आणि इतर प्रवर्गाच्या मतमोजणी होण्यापूर्वीच व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्याअगोदरच बाहेर निकाल कसा समजला, हा सर्व प्रकार लोकशाहीत निंदनीय आहे.

ही सर्व निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे. निवडणुकीत पक्षपातीपणा झालेला असून, मतपत्रिकांमध्ये विसंगती व शंकेला जागा राहील, असे काम निवडणूक राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे. त्यामुळे सोसायटीची निवडणूक रद्द करावी व पुन्हा नव्याने लवकर निवडणूक घ्यावी. या बाबत आठ दिवसांत योग्य ती चौकशी करून अन्याय दूर करावा, अन्यथा उमेदवार व त्यांचे कुटुंबिय तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत. त्यामुळे सर्व परिणामास सोसायटीची निवडणूक घेणारे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक व बंदोबस्तावर असणारे पोलिस कर्मचारी हे सर्वस्वी जबाबदार असतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर भैरवनाथ विकास आघाडीचे उमेदवार प्रकाश कदम, दिलीप दाभाडे, धनंजय पिसाळ, बाळकृष्ण पिसाळ, रमेश पिसाळ, अविनाश भोसले, किसन भोसले, तेजस मांढरे, शोभा पिसाळ, मंगल आप्पासाहेब भोसले, किसन कचरे, सखाराम कचरे यांच्या सह्या आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विवेक भोसले, संदीप पिसाळ, विजय रासकर, विक्रम पिसाळ, सुनील कदम, सचिन भोसले, विजय दाभाडे, प्रकाश पिसाळ, सुभाष भोसले, चंद्रकांत भोसले (वहिवाटदार), विक्रम वाघ, धुळा ठोंबरे, नंदू कचरे, हिरामण पिसाळ, राजेंद्र पिसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com