
केळघर : जवळवाडी (मेढा) येथील सावडण्याचा विधी करण्यासाठी आलेल्या ५० ते ६० जणांना मधमाशांनी मंगळवारी चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यातील ६ जणांवर मेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तरी इथून पुढे वारंवार अशा घटना होऊ नयेत म्हणून मेढा -मोहाट पुलावरील मधाचे पोळ काढून टाकावे. अशा आशयाचे निवेदन आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सतीश मर्ढेकर, प्रा. प्रकाश जवळ, पांडुरंग जवळ, पांडुरंग मर्ढेकर यांनी दिले आहे.