Satara : खिंडवाडीमध्ये बीडच्या युवकाचा खून झाल्याचे उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

खिंडवाडीमध्ये बीडच्या युवकाचा खून झाल्याचे उघड

सातारा : खिंडवाडी (ता. सातारा) येथे बेवारस स्थितीत आढळलेला मृतदेह मूळच्या बीड जिल्ह्यातील युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सध्या पुण्यात राहात होता, तसेच त्याचा खून झाला असल्याचेही शहर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अमोल डोंगरे (मूळ रा. बीड) असे त्या युवकाचे नाव आहे. तो बेपत्ता असल्याबाबत पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे.

चार दिवसांपूर्वी खिंडवाडी येथील दगडांच्या खाणीमुळे झालेल्या डबक्यातील पाण्यात एका युवकाचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाणीतील पाण्यातून मृतदेह वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदलेले होते. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न केले. अखेर काल रात्री त्या युवकाची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. त्यातून मारेकरीही समोर आले. लवकरच शहर पोलिस याबाबतची माहिती देणार आहेत

loading image
go to top