..अखेर गटांतर्गत घडामोडींचं राजकारण सुरु

Karad Municipality Election
Karad Municipality Electionesakal
Summary

राजकारणात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पाटलांनी वेगळ्या पद्धतीनं व्यूहरचना केल्याची जोरदार चर्चा आहे.

कऱ्हाड : पालिकेच्या (Karad Municipality) २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसवेकांची मुदत रविवारी (ता. २६) संपत आहे. त्यानंतर पालिकेत प्रशासकांचा कारभार सुरू होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराचे केवळ दोनच दिवस हातात उरल्याने पालिकेत सध्‍या कामे आटोपण्याची घाई प्रत्येक आघाडीत दिसते आहे. जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या कामांसह पालिकेच्या मासिक सभेतील मंजूर कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे. प्रत्येक आघाड्यांच्या पातळीवर स्वतंत्र होणारे कार्यक्रम पालिकेतील राजकीय गणितांनाच चालना देताना दिसत आहेत. त्या घोळात पालिकेची शेवटची सभाही होण्याची शक्यता मावळली आहे.

पालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील (Karad Municipality Election) विजयी कारभाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी रविवारी संपत आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांचाच कालावधी हातात राहिल्याने नगरसेवकांची कामे उरकण्याची लगबग सहजच दिसते आहे. कारभाऱ्यांचा कालावधी संपल्यानंतर नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, आघाड्यांची कार्यालये, गटनेत्यांच्या कार्यालयाला कुलूप लागणार आहे. त्या सगळ्यांचा पालिकेतील वावरही कमी होणार आहे. निवडणुका कधी लागतील, याची शाश्‍‍वती आजमिताला कोणालाच देता येत नसल्याने पालिकेच्या कारभारावर आता प्रशासकांचा अंकुश राहणार आहे. त्यापूर्वीच मागील आठवड्यापासून भूमिपूजनासह काही ठिकाणी उद्‌घाटनांचा सपाटा नगरसवेकांनी हाती घेतला आहे. त्यातून राजकीय उलथापालथही सहजच नजरेत आल्या. जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला लोकशाही व जनशक्ती आघाडीचे नगरसेवक होते.

Karad Municipality Election
'महाराजांचा अपमान कराल, तर खपवून घेणार नाही'

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Rohini Shinde), उपाध्यक्ष जयवंत पाटील (Jaywant Patil) यांच्यासह भाजपसहित अन्य नगरसवेकांची मात्र अनुपस्थिती जाणवली. मात्र, त्या कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) गटाचे नगरसेवक इंद्रजित गुजर यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया ताणणारी ठरली. त्या कार्यक्रमावर शहरातील राजकीय लोकांचे लक्ष होते. त्यात गुजर यांची एन्ट्री आणि प्रत्येक ठिकाणी गुजर यांना नारळ वाढविण्याचा मिळालेला मान चर्चेचा ठरला. पालिकेच्या राजकीय आडाख्यांचा अंदाज बांधणाऱ्यांनीही गुजर यांच्या उपस्थितीला अधिक चर्चेत आणले. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर जनशक्ती आघाडीने विविध कामांच्या भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव (Rajendra Yadav) यांनी सांधलेल्या वॉर्डातील धागा चर्चिला जातो आहे. जनशक्तीतील यादव गटाचे बऱ्यापैकी नगरसेवक त्या कार्यक्रमाला उपस्थित असले तरी उपाध्यक्ष पाटील यांना मानणाऱ्यांची गैरहजेरी लक्षात घेण्यासारखीच आहे. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडीही त्यामुळे अधोरेखित होत आहेत.

Karad Municipality Election
'काय बाय सांगू, कसं गं सांगू म्हणण्याची वेळ तुमच्‍यावर आली नसती'

उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्याकडे लक्ष

पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या सहा कार्यक्रमांसहित जनशक्ती आघाडीने त्यानंतर घेतलेल्या अन्य कार्यक्रमाला उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची अनुपस्थिती शहरात सर्वाधिक चर्चेत आली आहे. पालिकेच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उपाध्यक्ष पाटील यांनी याहीवेळी पालिकेच्या राजकारणात वेगळ्या पद्धतीने व्यूहरचना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पालिकेतील सर्वच आघाड्यांचे उपाध्यक्षांच्या हालचालीवर लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com