रस्ता खचला... ग्रामस्थ हतबल; औषधोपचारासाठी साताऱ्यात जाता येईना

रस्ता खचला... ग्रामस्थ हतबल; औषधोपचारासाठी साताऱ्यात जाता येईना
Updated on

सातारा : परमाळे ते बेंडवाडी (ता. सातारा) रस्ता खचल्याने सुमारे दोन महिन्यांपासून बेंडवाडीची वाहतूक पूर्णतः बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने ग्रामस्थांवर ही वेळ आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही गैरसोय दूर करावी, अशी ग्रामस्थांतून आग्रही मागणी होत आहे.
कष्टकरी माणसं लय भारी ! 
 
गेल्या वर्षी बेंडवाडीत भूस्खलन झाले होते. त्यात येथील रस्ता एका बाजूने खचला होता. खचलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी त्या वेळी तहसीलदार आशा होळकर यांनी भेट देऊन पाहणी केलेली होती. खचलेल्या रस्ता दुरुस्तीसाठी प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. रस्ता दुरुस्तीच्या या प्रस्तावास मंजुरीही मिळाली. त्यानंतर कार्यादेश होऊनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने जूनमध्ये सरपंच सर्जेराव गावडे यांनी ग्रामस्थांसोबत तहसीलदार होळकर यांची भेट घेतली.

भात पिकाच्या बियाण्यात भेसळ, रेठऱ्यातील शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे  

ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन तहसीलदारांनी संबंधित ठेकेदारास त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ठेकेदाराने काम सुरू करण्यासाठी रस्ता खचलेल्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यासाठी "पोकलेन'द्वारे खोल पाया घेतला; परंतु काम सुरू न केल्यामुळे आता ठेकेदाराने घेतलेल्या पायासह संपूर्ण रस्ताच खचल्याने बेंडवाडी गावाचा पूर्णतः संपर्कच तुटलेला आहे. ठेकेदाराने काम तर सुरू केलेच नाही; पण त्याच्या हगर्जीपणामुळे गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता तरी ठेकेदाराने लवकर काम सुरू करून लोकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत.

एक लाख दे, नाहीतर तुझं करिअर बरबाद करु; वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
 
महत्त्वाचे म्हणजे या गावात कुठलेही वाहन जात नसल्याने नागरिकांना तीन किलोमीटरची पायपीट करून परमाळे गावात किंवा डोंगर उतरून आसनगाव येथे यावे लागते. दूध डेअरीच्या गाड्या गावात येत नसल्याने दूध खराब होऊन लोकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. गावातील लोकांचा औषधोपचार व बाजारासाठी नेहमी साताऱ्याशी संपर्क येतो; परंतु वाहतुकीची सोयच नसल्याने गैरसोय होत आहे. 

""ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बेंडवाडीतील लोकांची प्रचंड गैरसोय झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी आता याप्रश्‍नी लक्ष घालून संरक्षक भिंतीचे काम सुरू करून तातडीने पूर्णत्वास न्यावे. अन्यथा आम्हा ग्रामस्थांना सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल.'' 

- सर्जेराव गावडे, सरपंच, बेंडवाडी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com