भांडूपच्या बंटी बबलीचा भुईंजकरांनाही दणका

भांडूपच्या बंटी बबलीचा भुईंजकरांनाही दणका

भुईंज (जि. सातारा) : बंटी बंबलीचे ऊर्फ नाईक दांपत्याने भुईंजमध्येही कारनामे दाखवले असून, सोने, चांदीसह रोख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संध्या महादेव भोसले (रा. विजयनगर, भुईंज) यांनी प्रिया नवनीत नाईक व तिचे पती नवनीत मधुकर नाईक (रा. भांडुप, मुंबई) यांच्या विरोधात चोरीची तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी ते ता. 1 मार्च 2020 रोजीच्या रात्री विजयनगर (भुईंज) येथील मी राहात असलेल्या भाड्याच्या खोलीतून 17 हजार 550 रुपये किमतीचे कानातील वेल, 18 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, 32 हजार 250 रुपये किमतीचे मणिमंगळसूत्र, 4500 रुपये किमतीची नाकातील मोत्याची नथ व 25 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे.

Video पाहा : उदयनराजेंनी जबाबदारीने वागले पाहिजे
 
विजयनगर येथे भोसले राहात असलेल्या भाड्याच्या खोलीतून संशयित प्रिया नवनीत नाईक व तिचे पती नवनीत मधुकर नाईक (रा. भांडूप, मुंबई) यांनी विश्वासाने माझे घराचे खोलीचे कुलूप त्यांच्या खोलीस चावीसह लावण्यास नेऊन विश्वासघाताने डुब्लिकेट चावी तयार करून त्याद्वारे माझे घराचे कुलूप खोलून घरातील लाकडी कपाटात ठेवलेल्या डब्यातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 97 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या गुन्ह्यातील संशयितांना येरवडा कारागृहामधून ताब्यात घेऊन पुढील तपास करणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी सांगितले. अधिक तपास हवालदार श्री. भोसले करीत आहेत. 

कृष्णा खोऱ्याला जागा देण्यास क्षेत्रमाहुलीचा विरोध; मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर! 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com