
सातारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात सर्वत्रच सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शाहू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हजारो भीमसैनिकांनी जमा होत त्यांना अभिवादन केले.