
भुईंज : भिरडाचीवाडी (ता. वाई) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना गैरवागणूक मिळत आहे. त्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी गेटला टाळे ठोकले. ग्रामस्थांनी वाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिक्षिकेच्या बदलीची मागणी केली. जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत शाळेचे टाळे काढणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली.