विकासकामांतून निवडणुकीची नांदी; उदयनराजेंची रणनितीस प्रारंभ

गिरीश चव्हाण
Thursday, 29 October 2020

सातारा नगरपालिकेची हद्दवाढ मंजूर झाल्याने शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर आणि इतर त्रिशंकू भाग हा सातारा पालिकेत आला आहे. या नवीन भागावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठीची धोरणे उदयनराजेंनी राबविण्यास सुरुवात केली आहे.

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी आले. हद्दवाढीमुळे नव्याने समावेश झालेल्या भागात मोर्चेबांधणी करण्याबरोबरच खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील विकासकामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने सहा विकासकामांचे भूमिपूजन करत हे आगामी निवडणुकीसाठीची नांदी छेडली.
 
कोरोना व इतर तांत्रिक कारणांमुळे सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील विकासकामे रखडली होती. या विकासकामांना गती मिळावी, यासाठी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार विकासकामे नगरपालिकेत मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांचे भूमिपूजन नुकतेच उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, आघाडीचे पक्ष प्रतोद निशांत पाटील, बांधकाम समितीचे सभापती मिलिंद काकडे, मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील, तसेच पालिकेचे इतर अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सुशांतच्या बहिणींविरोधात रियानं केलेले आरोप निव्वळ अंदाज- सीबीआय
 
उदयनराजेंच्या उपस्थितीत राधिका चौक ते राजतारा हॉटेल, पोलिस मुख्यालय ते मनाली हॉटेल चौक मार्गाच्या डांबरीकरणाचे, कर्मवीर कॉलनीतील हॉलचे, भीमाई कॉलनी आणि मिलिंद सोसायटीतील संरक्षक भिंतीच्या कामाचे, भीमाई कॉलनीतील पाण्याच्या टाकीच्या कामाचे पूजन झाले. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या आठपैकी सहा विकासकामांचे भूमिपूजन करताना उदयनराजेंनी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसून आले.

सातारा नगरपालिकेची हद्दवाढ मंजूर झाल्याने शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर आणि इतर त्रिशंकू भाग हा सातारा पालिकेत आला आहे. या नवीन भागावर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठीची धोरणे उदयनराजेंनी राबविण्यास सुरुवात केली आहे.

खंबीर मराठा सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, उदयनराजेंचा कडक शब्दात रोखठोक इशारा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhoomi Pujan Of Development Projects With The Hands Of Udayanraje Bhosale Satara News