

bhuinj police arrest pickup gang involved in cattle theft in wai satara district
Sakal
आनेवाडी : वाई तालुक्यातील कवठे, ओझर्डे, खडकी, कुडाळ तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरे चोरी करणाऱ्या पिकअप गँगला भुईंज पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. आरोपींनी सहा जनावरे चोरी करून पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील गुरांच्या बाजारात विक्री केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. चोरीला गेलेली जनावरे परत मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.