
भुईंज : महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून भुईंज पोलिस ठाण्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पतंग पाटील, सचिन शिंदे यांच्या पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.