

भुईज : पुणे-बंगळूर महामार्गावर सातारच्या बाजूने निघालेल्या दुचाकीला समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर पडून तिच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली.
मंगळवारी दुपारी १२ च्या दरम्यान खंबाटकी घाट उतरल्यानंतर सातारच्या बाजूने निघालेली दुचाकी हिला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात जीपने धडक दिल्याने पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर पडली व पाठीमागून येणाऱ्या टँकर (क्रमांक एमएच ०४ जीएफ ८५१०) याचे चाक महिलेच्या अंगावर गेल्याने जागीच ठार झाली.
संबंधित महिला खंडाळा येथील असून सीताबाई गेनबा चव्हाण (वय ६३) असे तिचे नाव आहे व तिचा पती गेनबा चव्हाण (वय ६५) हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद भुईंज पोलिसात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.