

भुईंज : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला १००८ महिलांनी कृष्णामाईची महाआरती केली, तसेच दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भक्तिभावात आणि अलोट गर्दीत दीपोत्सव उत्साहात झाला. येथील कृष्णा नदीच्या घाटावर जागतिक महिला दिन व दुर्गाष्टमीच्या निमित्ताने स्वामी विश्व परिवार यांच्या संयोजनातून व भुईंज प्रेस क्लब, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, स्वामी समर्थ सेवा केंद्र भुईंज यांच्या सहभागातून या सोहळ्याचे शुक्रवारी रात्री ८ वाजता भुईंज आयोजन करण्यात आले होते.