बस चालकाला भोवळ; पिंपोडेत वाठार-वाई बसला मोठा अपघात, प्रवाशी थोडक्यात बचावले

बस चालकाला भोवळ; पिंपोडेत वाठार-वाई बसला मोठा अपघात, प्रवाशी थोडक्यात बचावले
Updated on

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : येथे चालकाच्या छातीत दुखू लागल्याने एस.टीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने एसटी चालक व सर्व प्रवाशी अपघातातून बचावले आहेत. आज दुपारी दीडच्या सुमारास वाई आगाराची वाठारहून वाईला जाणारी एस.टी पिंपोडे बुद्रुक येथे बसस्थानकानजीक राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाजवळ आल्यानंतर एस.टी चालक अशोक फरांदे (रा. ओझर्डे) यांना छातीत अचानक तीव्र वेदना झाल्या. 

त्यानंतर भोवळ आल्याने काही समजण्याच्या आतच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी विरुध्द दिशेला जात बसने आधी रस्त्यावरील दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्यापासून सुमारे तीस फूट लांब असणाऱ्या दुकानासमोर पार्किंग केलेल्या चारचाकी इनोव्हा गाडीला जोरदार धडक देऊन एस.टी थांबली.

या ठिकाणी इनोव्हा गाडी नसती, तर एस.टी थेट ज्वेलरीच्या दुकानात गेली असती. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये एस.टी चालक फरांदे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने सर्व प्रवाशी अपघातातून बचावले. फरांदे यांना प्राथमिक उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. ज्वेलरी दुकान मालक राजेंद्र धर्माधिकारी यांच्या इनोव्हा गाडीचे प्रचंड नुकसान झाले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com