esakal | कऱ्हाडात बिहार पॅटर्न यशस्वी; 157 गावांतील 69 हजार वृक्षांना जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडात बिहार पॅटर्न यशस्वी; 157 गावांतील 69 हजार वृक्षांना जीवदान

कऱ्हाड तालुक्‍यातील वृक्षसंपदा वाढावी, यासाठी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, सदस्य, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व रोजगार हमी योजनेचे अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रांमपचायतीच्या माध्यमातून गावागावांत वृक्षलागवड होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यातून तालुक्‍यातील 157 गावांत बिहार पॅटर्नमार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

कऱ्हाडात बिहार पॅटर्न यशस्वी; 157 गावांतील 69 हजार वृक्षांना जीवदान

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : वृक्षवाढीसाठी पंचायत समितीच्या वतीने तालुक्‍यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बिहार पॅटर्न राबवण्यात आला. त्याअंतर्गत तालुक्‍यातील 157 गावांत तब्बल 69 हजार 700 वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्ष संगोपन आणि संवर्धनासाठी नेमलेल्या मजुरांनी मोठी मेहनत घेतल्याने आणि निसर्गानेही चांगली साथ दिल्याने ती रोपे जगण्याचे प्रमाणही 100 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे तालुका वृक्षाच्छादीत होण्यासाठीची सकात्मक स्थिती निर्माण झाली आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यातील वृक्षसंपदा वाढावी, यासाठी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, सदस्य, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व रोजगार हमी योजनेचे अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रांमपचायतीच्या माध्यमातून गावागावांत वृक्षलागवड होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यातून तालुक्‍यातील 157 गावांत बिहार पॅटर्नमार्फत वृक्षारोपण करण्यात आले. त्याद्वारे तब्बल 69 हजार 700 वृक्षांचे रोपण करण्यात आले. ती रोपे सांभाळण्यासाठी, पाणी घालण्यासाठीही ग्रामपंचायतीमार्फत नेमण्यात आलेल्या मजुरांना मजुरी देण्यात आली आहे. 200 रोपांसाठी एक मजूर अशी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात त्या मजुरांना झाडे जगवणे जिकिरीचे आणि आव्हानाचे होते. 

प्रीतिसंगम घाटावर रात्रीस खेळ चाले!

मात्र, ती झाडे त्यांनी मोठ्या कष्टाने जगवली. त्यासाठी त्यांना मध्यंतरी झालेल्या पावसाचीही मोठी मदत झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील वृक्षाच्छादीत भाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत कऱ्हाड तालुक्‍यात राबवण्यात आलेल्या बिहार पॅटर्न राबवण्यात आला. त्याअंतर्गत तालुक्‍यातील 157 गावांत प्रत्येक दिवशी 346 मजूर काम करतात. आठड्यात मनुष्य दिवस 2 हजार 75 झाले. दोन वर्षांत आतापर्यंत संबंधित मजुरांना वृक्ष संगोपन व संवर्धानसाठी रोजगार हमी योजनेतून एक कोटी 45 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळून पैसेही मिळाले आहेत. 

अजित पवारांमुळेच सिंचन योजना मार्गी : पालकमंत्री पाटील

कऱ्हाड तालुक्‍यातील 157 ग्रामपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजनेतून बिहार पॅटर्नची वृक्षलागवड करण्यात आली. त्यातून मजुरांना काम आणि पैसे मिळाले आणि वृक्ष संगोपन आणि संवर्धनही झाले. 
-डॉ. आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी, कऱ्हाड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे