
मलकापूर : कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. अशोक शिवराम जमाले (वय ६५, रा. मुंढे, ता. कऱ्हाड) असे अपघातातील मृताचे नाव आहे.