Bird Flu इफेक्ट : सातारा जिल्ह्यात दोन हजार कोंबड्यांची विल्हेवाट

रमेश धायगुडे
Wednesday, 20 January 2021

सर्वत्र औषध फवारणी करून सर्व पोल्ट्री फॉर्म पुढील आदेशापर्यंत सील केले आहेत.

लोणंद (जि. सातारा) : मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील सुमारे दोन हजार कोंबड्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने मंगळवारी (ता.19)  मारून त्यांची जमिनीत पुरून योग्य ती विल्हेवाट लावली. दरम्यान, केंद्रीय क्वारंटाइन विभागाचे प्रमुख डॉ. साहू व राज्य रोग अन्वेषण विभागाचे उपायुक्त डॉ. उलसुरे यांच्या पथकानेही येथे भेट देऊन सूचना दिल्या.
 
साेमवारी रात्री उशिरा भोपाळ प्रयोगशाळेतून मृत कोंबड्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बर्ड फ्लू या रोगामुळेच या कोंबड्या मृत पावत असल्याचे निदान झाल्याने या रोगाचा प्रसार रोखून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कापरेवस्तीच्या एक किलोमीटर त्रिजेचे क्षेत्र "संक्रमित क्षेत्र', तर दहा किलोमीटरचा त्रिजेचे क्षेत्र "सर्वेक्षण क्षेत्र' घोषित केले आहे. कापरे वस्तीच्या एक किलोमीटर क्षेत्रातील महसूल व ग्राम पंचायत कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन तातडीचा सर्व्हे केला. कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने मारून पुरून विल्हेवाट लावली, तसेच सर्वत्र औषध फवारणी करून सर्व पोल्ट्री फॉर्म पुढील आदेशापर्यंत सील केले आहेत

सावधान! माण तालुक्यात 97 कोंबड्यांचा मृत्यू  

पोलिसांच्या मध्यस्थिने पुन्हा जुळल्या ‘रेशीमगाठी’

दरम्यान पिंपरे बुद्रुक येथील राजेंद्र नामदेव कदम यांचा पोल्ट्री फॉर्म सील करून या पोल्ट्री फॉर्ममधील 206 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने मारून, जीसीबीने तीन खड्डे घेऊन त्या पुरून, पशुखाद्य व अन्य साहित्य जाळून टाकून, तसेच औषध फवारणी करून ही पोल्ट्री सील करत या कारवाईस प्रारंभ करण्यात आला.

बर्ड फ्लू - खबरदारी आणि जबाबदारी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Outbreak In Khandala Satara Marathi News