esakal | ग्रामस्थांनो! बर्ड फ्लूची भीती बाळगू नका, काळजी घ्या; जावळीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थांनो! बर्ड फ्लूची भीती बाळगू नका, काळजी घ्या; जावळीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना

ग्रामस्थांनी बर्ड फ्लूची भीती बाळगू नये असे आवाहन पंचायत समिती जावली पशुवैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे

ग्रामस्थांनो! बर्ड फ्लूची भीती बाळगू नका, काळजी घ्या; जावळीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी शेख वाड्यात गेल्या आठवड्यात काही कोंबड्या मृत झाल्या होत्या. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथून राष्ट्रीय उच्च सुरक्षा संस्थान एवीयन इंफुएन्झा ओ. आई. ई. संदर्भ प्रयोगशाळा भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. या मृत कोंबड्या बर्ड फ्लूमुळे दगावल्या नसल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. तरी ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. विवेक इटनकर यांनी केले आहे.

डॉ. विवेक इटनकर म्हणाले ग्रामस्थांनी बर्ड फ्लू आजाराबाबत भीती न बाळगता योग्य ती काळजी घ्यावी. तसेच साधारण मरतुकी आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. कुडाळ येथे कुक्कुटपालन व्यासायिकांसाठी बर्ड पलू आजाराबाबत तांत्रिक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बर्ड फ्लू आजाराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले आहे. योग्य काळजी घेतल्यास याचा प्रतिबंध करणे शक्य आहे. ग्रामस्थांनी बर्ड फ्लूची भीती बाळगू नये असे आवाहन पंचायत समिती जावली पशुवैद्यकीय विभागामार्फत करण्यात आले आहे.

कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका? काय करावं आणि काय नको?

राष्ट्रपतींच्या गिफ्टने खासदार श्रीनिवास पाटील गेले भारावून
 

  • अर्धवट शिजवलेली अंडी खाऊ नये
  • चिकन शिजत असताना मधेच खाणं टाळावं
  • संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांच्या थेट संपर्कात येऊ नका
  • मेलेल्या पक्षांना हाताळू नका
  • कच्चे मटण रिकाम्या जागी ठेवू नये तसंच त्याला हातही लावू नये
  • कच्चे मटण हाताळताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा
  • पुन्हा पुन्हा हात धुवा, आजुबाजुची जागा स्वच्छ ठेवा.
  • चांगले आणि पूर्ण शिजलेले चिकन, अंडी खा

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top