Video : शहरानंतर आता दुष्काळी तालुक्यात गव्याचा गवगवा

ऋषिकेश पवार
Wednesday, 30 December 2020

चांदोलीपासून पाचवड फाटामार्गे चौरंगीनाथ व तेथून विटा मार्गे नेर तलावाकडे गेले असावेत. तसा वनविभागाचाही अंदाज आहे. त्यामुळे या गव्यांचा प्रवास हा ऊस खायला आवडत असल्याने सुरू असल्याच्या नोंदी आहेत असे नाेंद असल्याचे सांगितले जात आहे.
 

विसापूर (जि. सातारा) : नेर तलाव (ता. खटाव) परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली. दरम्यान, आढळलेला गवा चांदोली अभयारण्यातील असण्याची शक्‍यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला.

नेर तलाव परिसरात शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले असता त्यांना सोमवारी (ता. 28) दुपारी या गव्याचे दर्शन घडले. या वेळी शेतकरी गव्याला पाहून घाबरले. शेतकऱ्यांना बघून गव्याने डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, यामुळे परिसरातील शेतकरी, तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतातील ओलिताची कामे सुरू आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना ओलितासाठी शेतात जावे लागते. मात्र, शेत-शिवारात गवा आढळून आल्याने शेतकरी रात्रीचे शेतात जाण्यास घाबरत आहेत.

नव्या वर्षातील पहिले दाेन दिवस साता-यातील मिलिटरी कॅंटीन राहणार बंद
 
दरम्यान, गवा वन्यजीव प्राणी असल्याने त्यांना मानवाचा अधिवास नसतो. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच हा गवा डोंगराच्या कडेला असलेल्या शेत-शिवारातून फिरत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील वन विभाग आणि पोलिसांनी तातडीने गव्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादीच्या 'एकला चलो रे' च्या भूमिकेने वाईतील कॉंग्रेस आक्रमक 
 
खटाव तालुक्‍यातील नेर तलावाजवळ आढळलेला गवा चांदोली अभयारण्यातील असावा, असा तर्क पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, ""चांदोली अभयारण्यातून आलेला गवा कऱ्हाड तालुक्‍यातील पाचवड फाटा, सोनसळच्या चौरंगीनाथ परिसरात दिसला होता. तो गवा कृष्णा नदी ओलांडून आले होते, तसेच कऱ्हाड-तासगाव रस्ताही ओलांडून चौरंगीनाथ परिसरात दिसले होते. तेथून ते हुसकावून लावण्यात आले होते. हुसकावलेले तीन गवे सहा महिन्यांपूर्वी विटा परिसरात दिसले होते. वनविभाग व ग्रामस्थांनी त्यांना तेथूनही हुसकावले आहे. वनहद्दीतील झाडेझुडपे व उसाचा आसरा घेत लपत छपत प्रवास करणारे गवे चांदोलीपासून पाचवड फाटामार्गे चौरंगीनाथ व तेथून विटा मार्गे नेर तलावाकडे गेले असावेत. तसा वनविभागाचाही अंदाज आहे. त्यामुळे या गव्यांचा प्रवास हा ऊस खायला आवडत असल्याने सुरू असल्याच्या नोंदी आहेत.''

Edited By : Siddharth Latkar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bison Found In Khatav Drought Area Satara News