वाईत महाविकास आघाडीविरोधात भाजपचे जोरदार आंदोलन

वाईत महाविकास आघाडीविरोधात भाजपचे जोरदार आंदोलन
Updated on: 

वाई (जि. सातारा) : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या प्रमाणावर अंकुश घालता न आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वाई शहर भाजपच्या वतीने महाआंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग, हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. कोरोना महामारीसारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार व विनयभंग झाले. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी कारवाईची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदनही पाठवले. परंतु, सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. त्यामुळे हे निषेध आंदोलन केले. 

याबाबत प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, शहराध्यक्ष राकेश फुले, यशवंत लेले, काशिनाथ शेलार, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, मनीषा घैसास, डॉ. शष्मिता जैन, नरेंद्र महाजन, अजय कामठे, मंजूषा भाटे, उत्तम जायगुडे, दीपक जाधव, प्रसाद चरेगावकर, ज्योती गांधी, तेजस जमदाडे, सूरज जमदाडे, आदित्य गांधी, महेश गाडे, अभिजित ननावरे, अभिजित सुतार, केतन रासकर, तुषार सुळके, केशव सूर्यवंशी, अरविंद बोपर्डीकर, आनंदा सुकाळे, मानसी पटवर्धन, सुषमा शिंदे, कविता जेबले, भारती कुलकर्णी, प्रथमेश जमदाडे, अमित जमदाडे, विशाल फरांदे, साहिल जमदाडे आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara District Pride Lieutenant Aditi Dhigare Leads Naval Honour Guard for Vice President CP Radhakrishnan at Karwar Naval Base
Maharashtra District Bank Election Candidates Step Up Field Campaigning to Win Votes as Shiv Sena Gains Support Ahead of Polls
Raju Shetti Leads an All-Party Protest in the Dry Krishna Riverbed at Bhilawadi, Warning of Further Action Over Agricultural Water Supply.
eknath shinde, manoj jarange patil and prithviraj chavan
Marathi News Esakal
www.esakal.com