राज्य सरकारविरोधात साताऱ्यात भाजपची घंटा खणाणली

उमेश बांबरे
Wednesday, 14 October 2020

"दार उघड उद्धवा दार उघड, मंदिरे उघडलीच पाहिजेत, प्रार्थनास्थळे मोकळी झालीच पाहिजेत, मंदिरे बंद, उघडे बार, उद्धवा अजब तुझे धुंद सरकार...'अशी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले.

सातारा : "दार उघड उद्धवा दार उघड, मंदिरे उघडलीच पाहिजेत, प्रार्थनास्थळे मोकळी झालीच पाहिजेत, मंदिरे बंद, उघडे बार, उद्धवा अजब तुझे धुंद सरकार...'अशी घोषणाबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला जागे करण्यासाठी येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले. ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. सातारा शहरातील सिद्धी मारुती मंदिर राजवाडा, नवदुर्गा अंबामाता मंदिर मोळाचा ओढा, समर्थ मंदिर, कुबेर विनायक मंदिर, हनुमान मंदिर सदरबझार, तुळजाभवानी मंदिर, काळाराम मंदिर, मारुती मंदिर झेंडा चौक करंजे, शनी मारुती मंदिर, शाहूनगर दत्त मंदिर, शाहूपुरी दत्त मंदिर या ठिकाणी आंदोलन झाले. आंदोलनानंतर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी आनंदवाडी दत्त मंदिर येथे एकत्र आले व त्यांनी लाक्षणिक उपोषण करून घंटानाद केला. 

शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विठ्ठल बलशेटवार, अमोल सणस, ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, सिद्धी पवार, धनंजय जांभळे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे, रवी पवार, सुनिशा शहा, शैलेंद्र कांबळे, रिना भणगे, वैष्णवी कदम, डॉ. उत्कर्ष रेपाळ, डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, वसंतशेठ जोशी, विवेक कदम, नीलेश शहा, दीपक क्षीरसागर, चंदन घोडके, कार्यकर्ते व मंदिरांचे पुजारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Agitation In Satara District Against The State Government Satara News