पदवीधर निवडणुकीत उदयनराजेंची भुमिका गुलदस्त्यात

उमेश बांबरे
Thursday, 26 November 2020

या निवडणुकीत उदयनराजेंची काय भूमिका काय राहणार याबाबत राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.
 

सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले अद्याप कुठेही प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. भाजपचे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हे दाेन तीन दिवसांपुर्वी त्यांची भेट घेण्यासाठी साताऱ्यात आले होते. पण उदयनराजेंची आणि देशमुखांची भेट होऊ शकली नाही. दूसरीकडे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी उदयनराजेंची जलमंदीर पॅलेस या राजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजेंनीही कोकाटे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. उदयनराजे भोसले या निवडणूकीत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सध्या सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. भाजपसह महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. दररोज मेळावे, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी यावर उमेदवारांनी भर दिला आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नेत्यांत कलगीतूरे रंगले आहेत.

साताऱ्यात उदयनराजेंचा हटके अंदाज; जिप्सी रायडिंग अन् गाण्यावर अफलातून ठेका..

या सर्व परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले हे मात्र, अद्याप तरी शांतच आहे. सहाजिकच ते भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी असणार आहेत. मंगळवारी पदवीधरचे अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. ही भेट लक्षवेधी ठरली आहे. या भेटीवेळी उदयनराजे यांनी कोकाटे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ऐकूनच या निवडणुकीत उदयनराजेंची काय भूमिका काय राहणार याबाबत राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.

तक्रारींमुळेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामकाजाची चाैकशी : बाळासाहेब पाटील

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Udayanraje Bhosale Away From Graduate Election Campaign Satara News