खासदार उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्‍यक्षांची भेट; राजकीय चर्चांना उधाण, भेटीत काय घडलं?

खासदार उदयनराजे भोसले यांनी ज्‍येष्‍ठ नेते प्रतापराव भोसले यांची भुईंजमध्ये भेट घेतली.
MP Udayanraje Bhosale met Congress senior leader Prataprao Bhosale in Bhuinj
MP Udayanraje Bhosale met Congress senior leader Prataprao Bhosale in Bhuinjesakal
Summary

या भेटीदरम्यान ज्‍येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

भुईंज : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी काल (शनिवार) काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्‍यक्ष, ज्‍येष्‍ठ नेते प्रतापराव भोसले यांची भेट घेऊन, त्‍यांच्‍या तब्येतीची चौकशी केली. गप्‍पा मारल्‍या आणि भुईंज येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानातून परतताना उदयनराजेंनी त्यांचे आशीर्वादही घेतले.

जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल सकाळी ज्‍येष्‍ठ नेते प्रतापराव भोसले (Prataprao Bhosale) यांच्या भुईंज येथील निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान ज्‍येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे, तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो असल्याचे खासदार उदयनराजेंनी सांगितले.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मोहनराव भोसले, श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे गजानन भोसले, माजी सरपंच अनुराधा भोसले, वाई पंचायत समितीचे सदस्य दीपक ननावरे, युवा नेते ईशान भोसले, पैलवान राहुल शिंदे, विक्रम केसरकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com