esakal | ठरलं! आगामी निवडणुकांची 'रणनीती' भाजप ठरविणार; चंद्रकांतदादा उद्या साताऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकांबाबत भारतीय जनता पक्षाकडून कोणतीच भूमिका जाहीर झालेली नाही.

ठरलं! आगामी निवडणुकांची 'रणनीती' भाजप ठरविणार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : येऊ घातलेली जिल्हा बॅंकेची निवडणूक (Satara Bank Election) आणि आगामी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी (Zilla Parishad and Panchayat Committee election) भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) रणनीती ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उद्या गुरुवारी (ता. ९) साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि आजी- माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, तसेच ते विभागवार बैठकाही घेणार आहेत.

जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकांबाबत भारतीय जनता पक्षाकडून कोणतीच भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर करून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लावण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येत्या गुरुवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत पक्षाच्या विभागवार बैठका घेणार आहेत.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसह आगामी काळात होणाऱ्या पालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचे मंडल अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. यामध्ये ते सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी सर्व निवडणुकांच्या बाबतीत पक्षाचे धोरण ठरविणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर ही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा निवडणुकीबाबत असलेला संभ्रम दूर करून श्री. पाटील हे त्यांना आगामी काळात कोणती रणनीती वापरायची याविषयीही मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा हा दौरा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

loading image
go to top