भाजप कामगार आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

हेमंत पवार
Saturday, 24 October 2020

समाजातील शेवटचा घटक जोपर्यंत सुखी होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, या तत्त्वाप्रमाणे भाजपचा असंघटित कामगारांकडे बघण्याचा दृष्टिकोन संवेदनशील आहे. परंतु, सध्या सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिघाडी सरकारने मात्र कामगारांबाबत दुटप्पी भूमिका घेतली आहे, असा आरोप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ताटे यांनी केला.

कऱ्हाड (जि. सातारा) : भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या जिल्ह्याच्या बैठकीत कामगार आघाडी जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. त्यात कामागार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत शिंदे यांची निवड झाली. त्याशिवाय कऱ्हाड शहराध्यक्षपदी विश्वनाथ फुटाणे, पाटण तालुकाध्यक्षपदी शंकरराव जाधव, जावळी तालुकाध्यक्षपदी जगन्नाथ गावडे यांच्याही नियुक्‍त्या झाल्या. 

कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश ताटे, प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे, प्रदेश सरचिटणीस प्रीतीताई व्हीटकर, प्रदेश उपाध्यक्ष अमित कदम, पश्‍चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा राजश्री जायभाय, प्रिया नाईक, दीप्ती देशपांडे, अशोक वणवे, तुळशीदास दुंडे-पाटील, नीलेश बदडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अल्ली आगा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कामगार आघाडीच्या कामाचा आढावा आणि पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली. भाजपने असंघटित कामगारांना मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

साहेब, माझा कुणावरच भरवसा न्हाय.. आता मी काय करू;  हताश माउलीची दरेकरांना साद

समाजातील शेवटचा घटक जोपर्यंत सुखी होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, या तत्त्वाप्रमाणे भाजपचा असंघटित कामगारांकडे बघण्याचा दृष्टिकोन संवेदनशील आहे. परंतु, सध्या सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिघाडी सरकारने मात्र कामगारांबाबत दुटप्पी भूमिका घेतली आहे, असा आरोप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ताटे यांनी यावेळी केला. जिल्हाध्यक्ष अल्ली आगा यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Workers Alliance District Executive Announced Satara News