
कऱ्हाड : भारतीय जवानांच्या समर्थनार्थ भाजपतर्फे येथे आज तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रॅलीत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. येथील विजय दिवस चौकातून निघालेली रॅली येथील प्रशासकीय कार्यालयावर नेण्यात आली. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही रॅलीत प्रशासकीय कार्यालयाजवळ आल्यानंतर सहभाग घेतला. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.