
-रूपेश कदम
दहिवडी : महाराष्ट्रातील बहुतांशी ग्रामपंचायतींसाठी करवसुली डोकेदुखीची ठरते. मात्र यावर मात करण्यासाठी माण तालुक्यातील आंधळी ग्रामपंचायतीने लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कल्पक योजना राबवली आहे. ‘ग्रामपंचायत कर भरा व लाखोंची बक्षिसे मिळवा’ अशी ही योजना असून विशेष म्हणजे यामध्ये सर्व बक्षिसेही ग्रामस्थांनीच दिली आहेत.