

भुईंज : खानापूर (ता. वाई) येथील धोम धरणाच्या डाव्या कालव्यात बुडून दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी अथर्व गोरख माने (वय १२) याचा काल मृतदेह सापडला होता. तर अर्नव अमोल माने (वय ८) याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. दरम्यान, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खानापूरमध्ये सापडला.