Judge Dhananjay Nikam : न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
Satara News : साताऱ्यातील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, खासगी व्यक्ती किशोर संभाजी खरात, आनंद मोहन खरात व एका अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Bombay High Court's ruling denies pre-arrest bail to Judge Dhananjay Nikam in a significant legal decision.Sakal
सातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन आज उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी आज फेटाळला.