Mahabaleshwar Crime : महाबळेश्‍वरमध्ये बुकिंग एजंटने संपवले जीवन ; एलिफंट हेड पॉइंटवरून पर्यटकांसमोर मारली उडी

Mahabaleshwar News : बुकिंग एजंट म्हणून व्यवसाय करणाऱ्या संजय वेलजी रुघानी यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. अंदाजे चारशे फूट खोल दरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. तब्बल सहा तासांच्या ट्रेकर्सच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
Mahabaleshwar Crime
Mahabaleshwar Crime Sakal
Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर लॉडविक पॉइंट परिसरातील एलिफंट हेड पॉइंट येथून उडी मारून बुकिंग एजंट म्हणून व्यवसाय करणाऱ्या संजय वेलजी रुघानी (वय ५२, सध्या रा. पाचगणी. मूळ शांतीनगर, मीरा रोड, मुंबई) यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com