esakal | Corona Impact : सलग दुसऱ्या वर्षी 'बोरीचा बार' राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Boricha Bar festival

दर वर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरी व सुखेडमधील ओढ्याकाठी येऊन बोरीचा बार भरतो.

Corona Impact : सलग दुसऱ्या वर्षी 'बोरीचा बार' राहणार बंद

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : बोरी व सुखेड (ता. खंडाळा) गावादरम्यान दर वर्षी भरणारा ‘बोरीचा बार’ (Boricha Bar) या वर्षीही कोरोनामुळे (Coronavirus) न भरवण्याचा निर्णय बोरी व सुखेड गावांतील प्रमुख व पोलिस प्रशासनाच्या (Lonand Police) सुखेड येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही ‘बोरीचा बार’ बंदच राहणार आहे. परिणामी, येथील महिलांना शिव्यांची लाखोली वाहून विविध खेळांचा आनंद घेता येणार नाही.

दर वर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरी व सुखेडमधील ओढ्याकाठी येऊन बोरीचा बार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांनी या दोन्ही गावांतील प्रमुखांची सुखेड येथे एकत्रित बैठक घेऊन या वर्षी ‘बोरीचा बार’ रद्द करण्याबाबत आवाहन केले.

हेही वाचा: शिखर बॅंक घोटाळ्यात थोरल्यासह धाकट्या पवारांचा हात

दोन्ही गावांतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत या वर्षी ‘बोरीचा बार’ न भरवण्याचा एकमताने निर्णय घेतला. या बैठकीला पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, तलाठी श्री. जाधव, सुखेडचे सरपंच भीमराव धायगुडे, बोरीचे सरपंच बापूराव धायगुडे, सुखेडचे पोलिस पाटील रमेश धायगुडे, बोरीचे पोलिस पाटील नवनाथ पिसाळ, विजय येळे, सुखेडचे ग्रामसेवक नंदकिशोर ओव्हाळे उपस्थित होते.

loading image
go to top