
बिजवडी : राज्याच्या ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने या योजनांसाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.