Murder Case : बुधावलेवाडीतील तरुणाच्या खूनप्रकरणी जन्मठेप; वडूज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा
Satara Crime News : बाळू बुधावले याने मोठा दगड व सूरज बुधावले याने लहान दगड उचलून हिम्मत याच्या डोक्यात व तोंडावर मारला. पडलेले दगड उचलून हिम्मत याच्या अंगावर मारून त्यास जखमी करून निर्दयतेने दगडाने ठेचून ठार केले.
The Vaduj District Court has sentenced the accused to life imprisonment in the Budhawalewadi murder case, ensuring justice for the young victim.Sakal
वडूज : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्यास आज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाळू गजानन बुधावले (वय ४०, रा. बुधावलेवाडी पोस्ट- विसापूर, ता. खटाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.