Bus was burnt to ashes : अलगुडेवाडीनजीक आगीत बस खाक; चालक, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावले
Satara News : बारामतीहून फलटणला येणारी बारामती- कोल्हापूर सीएनजी बसने (एमएच १४ बीटी ४९७१) अलगुडेवाडी हद्दीतील गणेशनगर येथे दुपारी अचानकपणे पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सांगवी/सोमंथळी : फलटण- बारामती रस्त्यावर अलगुडेवाडी (गणेशनगर, ता. फलटण) येथे एसटीच्या सीएनजी बसने आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये बस जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.